बाल कामगार पुनर्वसन स्वतंत्र यंत्रणेची आवश्यकता
|
महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती
कार्यालय, रायगड-अलिबाग
|
||
|
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
|
|
Twitter-@dioraigad
Facebook-dioraigad
|
दिनांक :- 28 सप्टेंबर 2016 लेख क्र. 41
बाल कामगार
पुनर्वसन
स्वतंत्र
यंत्रणेची आवश्यकता
|
बाल कामगारांना कामावर ठेवणे
हा कायद्याने गुन्हा आहे. या अनुषंगाने बाल कामगार
कायदा व बाल कामगाराचे पुनर्वसन, बालकांचे हक्क या विषयीचा आढावा घेणारा लेख…
|
नातीच्या वाढदिवसासाठी खेळणी
घेण्यासाठी खेळण्याचा दुकानात प्रवेश करणार त्याच वेळी माझे लक्ष दुकानाबाहेर
बसलेल्या एका गोऱ्या गोमटया 12 ते 13 वर्षाच्या
मुलाकडे गेले तो अर्ध भिजलेल्या अवस्थेमध्ये दुकानाबाहेर ठेवलेली खेळणी विकत होता. मी सवयीप्रमाणे त्याला विचारले "स्कूल जाता है क्या?"
त्याने मला परिचयाचेच उत्तर दिले " गाव में जाता था, यहॉ घुमने आया हॅू, फुफा
लाया है". मी लगेचच ओळखले की, हा
बालकामगार आहे. मी काहीही न बोलता खेळणी खरेदी केली आणि पैसे देण्यासाठी मालकाच्या
काऊंटवर गेले. तोच तो मालक म्हणाला मॅडम मुलगा
कामाला ठेवलेला नाही. पाहुणा आलेला आहे. दूरचा रिश्तेदार आहे. मी त्याला विचारले बालकामगार कायदा माहित
आहे का? त्यावेळी त्याने दुकानात लावलेली पिवळी पट्टी दाखवून "येथे बाल
कामगार काम करत नाही" त्याच्या या वाक्याने मला अतिशय संताप आला. कारण दुकानाबाहेरील त्या मुलाचा चेहरा सत्य सांगत होता.
गेले 20 वर्षे सातत्याने बाल
कामगार निर्मुलन व पुनर्वसनात काम करत असताना असे अनेक व्यावसायिक मी जवळून
अनुभवलेले होते आणि या घटनेनंतर पुन्हा एकदा बाल कामगार कायद्याची अंमलबजावणी
प्रभावीपणे होणे गरजेचे वाटले.
आमच्या देशाने बालहक्क संहिता
स्वीकारली व त्यानुसार देशातील बालकांना शिक्षण, आरोग्य व सुरक्षितता देणे आणि
त्याचसोबत त्या बालकाबाबत बेकायदेशीर हस्तांतरण छळ, लैगिक शोषण, मारहाण व त्याची
पिळवणूक होणार नाही. तो मादक द्रव्यांच्या उपयोगात
येणार नाही.
मुलांचे किंवा मुलींचे आरोग्य,
शिक्षण व विकास याला बाधा येईल अशा कामांपासून संरक्षण मिळण्याचा मुलांचा हक्क
आहे. काम करण्यासाठीच्या वयाचे परिमाण सरकारने ठरवले आहे. 1986 साली करण्यात आलेल्या बाल
कामगार कायद्यात सुधारणा करुन ज्या बालकाच्या वयाची 14 वर्षे पूर्ण झाली नाहीत असे
बालक काम करताना आढळल्यास तो ज्या ठिकाणी काम करत आहे त्या मालका विरुध्द बाल
कामगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी कायदेशीर तरतूद आहे पण काही
आस्थापनांमध्ये अयोग्य व बेकायदेशीर मार्गाने लहान मुले काम करताना आढळत आहेत.
बाल कामगार कायद्याची अधिक
प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बाल कामगार कृतीदल समित्या
स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्यांचे अध्यक्षपद जिल्हाधिकारी
यांचेकडे असून संबंधित जिल्ह्यातील सर्व प्रथम वर्ग अधिकारी या समितीचे सदस्य
आहेत. तर दोन सदस्य हे बाल कामगार क्षेत्रात काम करणारे
स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आहेत.
रायगड जिल्हा
रायगड जिल्ह्यात बाल कामगारांच्या परिस्थितीचा विचार करताना धोकादायक उद्योगात जसे
हॉटेल, बेकरी, गॅरेज, चायनिज उद्योग इत्यादी ठिकाणी बाहेरील राज्यातील बाल कामगार
मजूर पुरविले जातात. ही बालके अति गरीब, आई वडील
नसणारे, एकटी आई असणारी अशा कुटूंबातील असल्याने त्यांना त्यांचे जवळील नातेवाईक
आपल्या सोबत महाराष्ट्रात आणतात आणि तेथून त्यांना विविध जिल्ह्यात पाठवले जाते. या बालकांच्या पुनर्वसनामध्ये खूपच अडचणी येतात कारण या मुलाला
त्यांचे एजंट पूर्ण पुनर्वसीत होऊच देत नाही.
रायगड जिल्ह्यात विटभट्टी
उद्योगात कातकरी मजूर हा काम करत आहे आणि तो आपले संपूर्ण कुटूंब
घेऊन ऑक्टोबर ते मे पर्यंत घरापासून दूर असणाऱ्या वीटभट्टयांवर राहतो. त्यामुळे आपले आई वडीलांसोबत काम करणाऱ्या कातकरी बालकामगारांचे
प्रमाणही कर्जत, खालापूर,पनवेल,अलिबाग,सुधागड-पाली व पाण्याचा पट्टा असलेल्या
ठिकाणी आढळतात. या बालकांचे शैक्षणिक नुकसान होते आणि शिक्षणाअभावी पर्यायाने तो मोठेपणी
वीटभट्टी मजूर बनतो. बालकामगारांच्या आरोग्याच्या
अनेक अडचणी त्यांच्या सोबत काम करताना जवळून अनुभवलेले आहे. त्यात त्यांना कातडीचे आजार, डोळयांचे आजार, घसा छाती यांचे आजार,
हाडे कमकुवत होणे इत्यादी आरोग्याचे प्रश्न दिसतात. तर
अस्वच्छता आणि अपुरा आहार, जास्त ओझ्याची कामी ताकदीच्या बालकांनी केलेली
कामे इत्यादीमुळे बाल कामगारांत टी.बी. आणि निमोनिया यासारखे आजारही आढळून येतात. एकदरंच या सगळयाचा त्या बालकाच्या आयुष्य मानावर परिणाम झालेला
आढळतो.
स्वतंत्र विभाग आवश्यक
जिल्हा कामगार आयुक्त कार्यालयामार्फत या बाल कामगारांचे कामकाज पाहिजे जाते. यांच्यातीलच काही अधिकारी बाल कामगार निर्मुलनासाठी काही धाडसत्रे
आयोजित करतात. त्यामुळे स्वतंत्र असे कोणतेही
काम बाल कामगारांसाठी केले जात नाही. जिल्हा कामगार विभागाकडे
त्यांची स्वत:ची अशी खूप कामे असतात. असो कोणतेही बाल कामगार मुल
पुनर्वसनासाठी बालगृहात आणले की, संबंधित मालकाचा विविध मार्गानी, मुल सोडण्याबाबत
एन.जी.ओ. वर दबाव आणतात. खरे तर खूप काम करुन थकलेल्या
त्या मुलाला बालगृहात फारच बरे वाटते. त्याला आराम, जेवण, खेळ व
सवंगडी मिळतात व ते मुल तिथे फुलते. पण तथा कथित मालक वर्गाला तो
बाल कामगार बालगृहातून पालकांच्या ताब्यात दिला की, आपल्यावरील कायदेशीर कारवाईतून
आपली सुटका होण्याचे पर्याय मोकळे होतात अशी त्यांची पक्की समजूत आहे. त्यामुळेच त्या बालकाला त्याचे आरोग्य सुधारण्यासाठी त्या
बालगृहात पोषक वातावरण मिळत असते. पण तथाकथित मालक एकदा बाल
कामगाराला पकडले की, त्याच्या पालकांना कुठूनही शोधून आणतात आणि बाल कल्याण
समितीपुढे मुल देण्याचा आग्रह धरतात. बाल कल्याण समितीला सुध्दा पालक असणारे मुल
पालकांच्या मागणीनुसार ताब्यात द्यावे लागते आणि पुन्हा ते बालक आपल्या प्रांतात
जाऊन बाल कामगार होते.
बाल कामगार मुक्त राज्य, जिल्हे
आणि तालुके करण्यासाठी स्वतंत्र असा "बाल कामगार निर्मूलन विभाग" शासकीय स्थरावर उभा राहणे
गरजेचे आहे. त्याची स्वतंत्र रचना, अधिकारी,
कर्मचारी व पुनर्वसन आराखडा असणे अत्यंत आवश्यक आहे. तरच काही प्रमाणात बालकामगार मुक्त होऊ शकेल
000000
सौ.स्मिता शैलेश काळे
सदस्य बाल न्यायमंडळ रायगड
मो.9850390804
जिमाका प्रसृत
Comments
Post a Comment