निर्मल सागर तट अभियान
दिनांक :- 03ऑक्टोबर 2016 लेख क्र-45
निर्मल सागर तट अभियान
निर्मल सागर तट अभियान
महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. तर रायगड जिल्ह्याला 240 कि.मी.चा समुद्र किनारा लाभला आहे. हा समुद्र किनारा फक्त सौदर्यात भर घालत आहे. असे नसून हा समुद्र किनारा सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे हे सर्व समुद्र किनारे स्वच्छ राहावे व त्याची योग्य निगा, व्यवस्थापन व्हावे यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डने निर्मल सागर तट अभियान व सागर तट व्यवस्थापन अभियान हाती घेतले आहे. या अभियानाची थोडक्यात माहिती देणारा लेख…
नैसर्गिक सौदर्यांने नटलेली सागरी किनार पट्टी स्वच्छ व सुशोभित करुन पर्यटन वृदिंगत करण्यासाठी तसेच सागरी किनाऱ्याचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, योग्य व्यवस्थापन आणि त्याचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत राबविण्यात येणाऱ्या निर्मल सागर तट अभियान राबविण्यात येत आहे. सागर किनारी राहणाऱ्या समाजाला या मोहिमेत समाविष्ट करुन त्यांना सागरी पर्यावरण आणि वाहतुकीचा सर्वांगिण विकासाबद्दल माहिती देणे, त्यांना मार्गदर्शन करुन त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणणे असा त्याचा मुख्य उद्देश आहे.
हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड बंदर विकासक , कार्पोरेट ऑफीसेस, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशासकीय संस्था यांच्या सेवा घेणार आहेत.या अभियानासाठी मेरीटाईम बोर्ड यांनी रुपये 4 कोटी इतकी तरतूद वार्षिक बजेट मध्ये केली आहे.
सागर किनाऱ्यावरील गावाच्या ग्रामपंचायती हे या अभियानाचे घटक असणार आहेत. या घटकाला त्यांच्या पर्यटन आणि रोजगार निर्माण करण्याच्या क्षमतेनुसार तीन वर्गात त्यांची विभागणी करण्यात येणार आहे. बी, अे, व अ + ग्रामपंचायतींच्या अखत्यारित समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती किनारे (बीच) विकासाचे आणि व्यवस्थापनाचे आराखडे तयार करतील. अ+ दर्जाच्या ग्रामपंचायतींना 20 लाख ," अ" दर्जाच्या ग्रामपंचायतीसाठी 15 लाख रुपये आणि ," ब " दर्जाच्या ग्रामपंचायतीला 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत. पहिल्या वर्षी यातील 75 टक्के रक्कम पंचायत समिती पर्यटन आणि वाहतूक निर्मितीसाठी खर्च करेल तर 25 टक्के रक्कम किनारे (बीच) व्यवस्थापन, प्रशिक्षण, जलक्रीडा व जलवाहतुक इत्यादी संदर्भात खर्च करण्यात येणार आहे.
स्थानिक कमिटी असल्याने लोकांना समुद्र किनारे संरक्षण आणि पर्यटनाच्या वृध्दीसाठी आणि किनारे (बीच) संवर्धनासाठी प्रयत्न करेल तसेच पर्यटकांशी कसे वागायचे, परदेशी भाषेविषयी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांचे कौश्यल्य अधिक वाढविण्यासाठी प्रयत्न करेल त्यांना भरती-ओहटी आणि इतर मूलभूत माहिती देऊन प्रशिक्षित करण्यात येणार आहे.
समुद्र किनारे व्यवस्थापन समिती (ग्रामपंचायत स्तरावर), मासेमारी, जलक्रीडा आणि साहसी खेळ, सांडपाणी व टाकाऊ कचरा व्यवस्थापन (सनिटेशन व वेस्ट मॅनेजमेंट) देखभाल, पर्यायी उर्जा स्त्रोत, किनारा संरक्षणासाठी सज्ज, पर्यटन आणि पर्यटकांच्या सोयी सुविधा, कौशल्य विकास वातावरण आणि भरती संदर्भात जागृत करणे, मॅनग्रोचे (कांदळवन) संवर्धन आणि विकास अशा स्तरावर ही कमिटी काम करणार आहे. यामध्ये 15 ते 21 सभासद असतील यामध्ये 30 टक्के महिला प्रतिनिधींचा समावेश असेल.
ही कमिटी राज्य सागर किनारा विकास संदर्भात सक्रीय सहभाग घेईल व ही कमिटी पर्यटन, समुद्र किनारा (costal) विकास आणि धूप कमी करण्यासाठी प्रस्ताव सुचवेल. थोडक्यात ही समिती सहभाग आणि सहकार्य देऊन निर्मल सागर तट अभियान अंमलबजावणी करेल.
सागरतट व्यवस्थापन अभियान- समुद्र किनारा परिसरातील पर्यटनाला गती मिळून परिसरातील अर्थकारणाला चालना मिळावी, जलक्रीडा आणि जलप्रवास यासाठी सर्वोत्तम प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी सुयोग्य नियोजन करुन या उपक्रमाला चालना देण्यात येईल. व्यवस्थापन समितीच्या इतर जबाबदाऱ्यांबरोबर समुद्र किनारी जीवनरक्षक यांची नियुक्ती करुन तेथे होणारे अपघात रोखणे हे एक आहे.
ग्रामपंचायत समिती विकासाच्या कृती आराखडा त्यांच्या समुद्र किनारा परिसरासाठी करणार आहे. सर्व समित्यांचा आराखडा एकत्र करुन जिल्हा अधिकारी/जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणारी समिती जिल्हयासाठी एकत्रित आराखडा करेल.
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्यामार्फत सर्व ग्रामपंचायत स्तरावरील समित्यांसाठी स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धा सागरतट व्यवस्थापन समिती आणि निर्मल सागर अंतर्गत सागरतट व्यवस्थापन समितीसाठी पहिले बक्षिस 50 लाखाचे राहणार आहे. तर दुसरे बक्षिस 25 लाखाचे आणि तीसरे बक्षिस 11 लाखाचे असणार आहे.
निर्मल सागरतट अभियानासाठी पहिले बक्षिस 21 लाख, दुसरे बक्षिस 11 लाख आणि तिसरे बक्षिस 5 लाखाचे राहणार आहे. रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासासाठीही 21 लाख, 11 लाख आणि तिसरे बक्षिस 5 लाखाचे असेल. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीसाठी अंतर्गत निर्मल सागरतट अभियान पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात आला. त्या अंतर्गत रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारा स्वच्छ करण्याची कामे करुन जवळपास 125 टन कचरा गोळा केला आहे. पुढील वर्षासाठी निर्मल सागरतट अभियान व सागरतट व्यवस्थापन अभियान सुरु राहील.
0000000

विष्णू काकडे
माहिती अधिकारी
जिल्हा माहिती कार्यालय
माहिती अधिकारी
जिल्हा माहिती कार्यालय
Comments
Post a Comment