अलिबाग-रेवदंडा,साळाव, मुरुड खाडीपूल वाहतुकीस सुस्थितीत

वृत्त क्र.343                                                                                                    दिनांक:-23 जून 2017

अलिबाग-रेवदंडा,साळाव, मुरुड
खाडीपूल वाहतुकीस सुस्थितीत
अलिबाग दि. 23 (जिमाका),  अलिबाग- रेवदंडा-साळाव-मुरुड रस्त्यावरील  रेवदंडा खाडीपूल वाहतुकीसाठी सुस्थितीत व सुरक्षित असून वाहतुकीस कुठलाही धोका नाही. अशी माहिती कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग,अलिबाग यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
            सदरील रेवदंडा खाडीवरील पुलास भेगा पडून पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांत  व सोशल मिडीयावर प्रसारित झाले होते. त्यानुसार या पुलाची पाहणी करण्यात आली. यात  सदर पुलाची भेग,  पूलाचे दोन गाळयामधील एक्सपांशन जॉइन्ट उघडे पडल्यामुळे दिसत आहे. त्याचा  पुलाच्या सुरक्षिततेवर कुठलाही प्रतिकुल परिणाम होत नाही. पूलाला कोणत्याही प्रकारचा  स्ट्रक्चरल धोका नाही. पूलाला पडलेली भेग भरुन घेण्यात आली असून पूल वाहतुकीसाठी सुस्थितीत व सुरक्षित आहे. वाहतुकीस कुठलाही धोका नाही अशी माहिती  त्यांनी दिली आहे.

000000000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान