सीडीएस परीक्षेसाठी पुर्वतयारी प्रशिक्षण: जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या 22 रोजी मुलाखती
अलिबाग
दि.19,(जिमाका)-संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी) नवी दिल्ली
यांचे मार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारासाठी Combined Defence Services
(CDS) ची परीक्षा 19 नोव्हेंबर, 2017 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या पुर्वतयारीसाठी
नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र
येथे दि.29 ऑगस्ट ते 11 नोव्हेंबर या
कालावधीत आयोजित प्रशिक्षणाचा जिल्ह्यातील
इच्छुक उमेदवारांना लाभ घेता यावा, यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-
अलिबाग येथे मंगळवार, दि.22 रोजी मुलाखतीचे
आयोजन करण्यात आले आहे.
यासंदर्भात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड- अलिबाग
यांच्या मार्फत कळविण्यात आले आहे की, सीडीएस परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8
सप्टेंबर, 2017 अशी आहे. सदर परीक्षेची जाहिरात 9 ऑगस्ट, 2017 या तारखेच्या
एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर (रोजगार समाचार) मध्ये आणि संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी)
नवी दिल्ली यांची वेबसाईट https://www.upsconline.nic.in येथे
प्रसिद्ध झाली आहे.
महाराष्ट्र
शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी Combined Defence Services (CDS)
या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक
रोड, नाशिक येथे 29 ऑगस्ट, ते 11 नोव्हेंबर, 2017 या कालावधीत सीडीएस प्रशिक्षण अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले
आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची
निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
तरी
रायगड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड येथे
22 ऑगस्ट, 2017 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्या आधी सैनिक कल्याण विभाग,
पूणे यांची वेब साईट www.mahasainik.com वरील
Recruitment Tab ला क्लिक करून त्यामध्ये सीडीएस कोर्स क्र.54 कोर्ससाठी उपलब्ध
महत्वाच्या तारखा (Important Dates) व सोबत असणाऱ्या सर्व परिशिष्टांचे
अवलोकन करून त्यांना डाऊनलोड करून त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काडून ते पूर्ण
भरून घेवून यावे.
अधिक
माहितीसाठी प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांना दूरध्वनी क्रमांक 0253-2451031 व 2451032 असून कार्यालयीन
वेळेत सकाळी साडेदहा ते सादेपाच वाजे दरम्यान प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क
करावा, असे आवाहन मेजर प्रांजल पी. जाधव (निवृत्त) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
यांनी केले आहे.
Comments
Post a Comment