स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात
अलिबाग, दि.15(जि.मा.का.)- स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्धापनदिनाचा सोहळा आज येथे उत्साहात
साजरा झाला. मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदान येथे पार पडला. यावेळी
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजवंदन करुन राष्ट्रध्वजास
मानवंदना देण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई
तटकरे, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल
पारसकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ. अविनाश गोटे, जिल्हा न्यायाधीश सेवलीकर, अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.
आर. पेठकर, अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील, उपअधिक्षक गृह राजेंद्र दंडाले, जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रसाद पाटील, निवासी
उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणे, जिल्हा नियोजन
अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के. वानखेडे, उपजिल्हाधिकारी रोहयो
प्रेमलता जैतू, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित
गवळी, तहसिलदार जयराज देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.
सुर्यवंशी यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सोहळ्यास
उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांचा सत्कार केला व
शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यात जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या
‘आपला जिल्हा’ या पुस्तिकेचे प्रकाशन
जिल्हाधिकारी सूर्यवंशी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विविध पुरस्कारांचे वितरण यावेळी जिल्हाधिकारी
सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सन्मानित करण्यात
आलेल्या गुणवंतांची व खेळाडूंची नावेः-
गुणवंत क्रीडा संघटक/कार्यकर्ता पुरस्कार 2016-17 सुरेश हरीभाऊ गावंड-खेळ-शुटींगबॉल.
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार-2016-17
लक्ष्मण नारायण गावंड,
गुणवंत खेळाडू पुरस्कार-2016-17 कु.मेघा अनंत परदेशी (महिला),
गुणवंत खेळाडू पुरस्कार-2016-17 कु.सागर रविंद्र वैद्य (पुरुष),
जिल्हा युवा पुरस्कार 2015-16 अशिष विश्वनाथ लाड (युवक), रा.दहिवली,
ता.कर्जत.
श्रीमती. प्रणिता नंदकुमार गोंधळी (युवती), रा.चेंढरे, ता.अलिबाग.
जिल्हा युवा पुरस्कार संस्था महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान, पाणदिवे,
पो.कोप्रोली, ता.उरण.
राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य विभागाकडून शिष्यवृत्ती
प्राप्त-कु.क्षितीज नागनाथ कोलेकर इयत्ता 10 वी. (99.40%) कु.गौरव गणपत दिवेकर इयत्ता 10 वी. (99.40%) कु.सागर पांडूरंग भजनवाले
इयत्ता 12 वी. (95.23%) कु.वैशाली विजय बौध्द इयत्ता 12 वी. (94.77%)
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा (इ.5 वी) व पूर्व माध्यमिक
शिष्यवृत्ती परिक्षा (इ.8 वी) राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थी-
शहरी विभाग-1) कु.ईशा अमित पालनिनकर इयत्ता 5 वी एच.ओ.सी.एल.स्कूल रसायनी
खालापूर. 2) कु.ओम यशवंत कुलपे इयत्ता 8 वी,
डेव्हिड इंग्लिश मिडीयम स्कूल, अलिबाग. 3) कु.पटेल अरक्यूपाम रिझवान ओसमान इयत्ता
8 वी अपेजय स्कूल खारघर.
ग्रामीण विभाग : 1) कु.मुरकोड अदिती शरणगोड, इयत्ता 8 वी प्रिया स्कूल
खालापूर, 2) परांजपे अथर्व रमेश इयत्ता 8 वी कारमेल इंग्लिश स्कूल.
जिल्हाधिकारी
कार्यालयात ध्वजवंदन
भारतीय स्वातंत्र्याच्या 70 वा वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
प्रांगणात मोठ्या उत्साहात ध्वजवंदन करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजवंदन करुन राष्ट्रध्वजास मानवंदना
देण्यात आली. या समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी किरण
पाणबुडे, उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव,
जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के. वानखेडे, उपजिल्हाधिकारी रोहयो प्रेमलता जैतू तसेच
विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी
पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत सादर केले. यावेळी सर्व शासकीय अधिकारी,
कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.विजय
सुर्यवंशी यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
देशभक्तीपर
चित्रपटाचे प्रदर्शन
ध्वजवंदन सोहळ्यानंतर जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या राजस्व सभागृहात ‘नेताजी’ या देशभक्तीपर चित्रपटाचे प्रदर्शन
उपस्थितांसाठी करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्यासह सर्व
वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
०००००
Comments
Post a Comment