राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा-2017-18:किक बॉक्सिंग स्पर्धेस आज प्रारंभ:राज्यभरातील 550 खेळाडूंचा सहभाग
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या
वतिने प्रतिवर्षी राज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यासाठी जवळपास ७५ खेळांच्या १४, १७ व १९ वर्षाआतील मुले व मुलीअशा वयोगटात स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धा तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तर या क्रमाने आयोजित करण्यात येतात. सन २०१7-१8 या वर्षात आयोजित करावयाच्या राज्यस्तर स्पर्धापैकी
‘किक बॉक्सिंग’ याखेळाच्या राज्यस्तर
शालेय क्रीडा
स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी संचालनालयाने रायगड जिल्ह्यास उपलब्ध करुन दिलेली आहे. जिल्हा क्रीडा परिषद, रायगडअलिबाग च्या वतिने दि. २७ ते २९ ऑक्टोबर, २०१7या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली, अलिबाग येथे करण्याचे निश्चित झाले आहे.
या स्पर्धांमध्ये राज्यातील अमरावती, औरंगाबाद,नागपूर,नाशिक, लातुर, मुंबई, पुणे, कोल्हापूर व
शिवछत्रपती क्रीडापीठ अशा एकुण ९ विभागातून ५५० खेळाडू, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने संकुलातील इनडोअर हॉल सज्ज करण्यातआला आहे. सहभागी खेळाडूंची निवास व्यवस्था संकुलातील वसतीगृहामध्ये करण्यात आली आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी
डॉ. विजय सुर्यवंशी, यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती स्थापन केली आहे.या
स्पर्धेमधून दि. 22 ते26 नोव्हेंबर, 2017
या
कालावधीत बिलासपूर, छत्तीसगढ येथे होणा-या राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी महाराष्ट्र
राज्याचा संघ निवडण्यात येणार असल्याने या स्पर्धेस विशेष महत्व आहे. या स्पर्धेमध्ये
रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते प्रणव सावंत, आदेश शेपोंडे व रौप्यपदक
विजेता सागर झावरे हे मुंबई विभागाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. तसेच साक्षी कदम, रितीका
पुजारी हे राष्ट्रीय खेळाडू मुंबई विभागाकडून सहभागी होत आहेत.स्पर्धेचा उदघाटन समारंभ उद्या गुरुवार
दि. २७ रोजी सकाळी
साडे आठ वा. जिल्हा क्रीडा संकुलातील
बहुउद्देशीय हॉलमध्ये जिल्हाधिकारी डॉ.
विजय सूर्यवंशी, रायगड यांच्या शुभहस्ते, उपसंचालक, एन. बी. मोटे, क्रीडा व युवक सेवा,मुंबई विभाग मुंबई यांचे अध्यक्षतेखाली, तसेच शिवछत्रपती क्रीडा
पुरस्कार विजेते नथुराम पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
किक बॉक्सिंग संघटनेचे मंदार पनवेलकर, प्रविण पाटील, संतोष म्हात्रे, प्रदीप शिंदे, संतोष खंदारे हे स्पर्धेसाठी तांत्रिक
सहकार्य पुरवीत आहेत.
स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडू, नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, महादेव कसगावडे, यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment