नेहरु युवा संघटनेमार्फत युवकांसाठी कार्यक्रम


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26-केंद्र शासनाने  युवक व पौगंडावस्थेतील मुलांच्या विकासासाठी नेहरु युवा संघठन दिल्ली या संस्थेने युवकांसाठी NPYAD या योजनेअंतर्गत विविध संस्थांकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.साहसी शिबिर,ॲडव्हेंचर (साहसी प्रकारासाठी अर्थसहाय्य),जीवन कौशल्य् शिक्षण,युवा नेतृत्व् व व्यक्तीमत्व् विकास प्रकल्प कार्यक्रम राबविणे.या उपक्रमांचा त्यात समावेश आहे.
या कार्यक्रमासाठी विविध संस्थांना सहभागी करुन घेण्यासाठी 20 दिवसाच्या आत अर्ज मागविण्यात येत आहेत. पत्ता-नेहरु युवा केंद्र संघटन,स्कोप मिनार कोअर-आयव्ही 2 रा मजला,लक्ष्मी नगर जिल्हा केंद्र, विकास मार्ग दिल्ली या ठिकाणी किंवा projectnyks@gmail.com  या ई-मेल वर पाठवावेत. अधिक माहितीसाठी व अर्जासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अलिबाग यांचेशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी,महादेव कसगावडे यांनी केले आहे.
०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन