प्रधानमंत्री पीक विमा योजनाः रब्बी हंगाम 2017-18 :सहभागासाठी 1 जानेवारी 2018 पर्यंत मुदत



अलिबाग, जि. रायगड, दि.20 (जिमाका)- प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2017-18 मध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत दि.1 जानेवारी, 2018 अशी आहे.  तथापि सोलापूर जिल्ह्यातील रब्बी ज्वारी या अधिसुचित पिकाकरिता दि.30 नोव्हेंबर, 2017  अशी मुदत देण्यात आली आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांचे विमा अर्ज  बँक व 'आपले सरकार सेवा केंद्र' (डिजीटल सेवा केंद्र) यांचे मार्फत स्विकारण्यात येतील. तरी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी दि. 01 जानेवारी, 2018 पुर्वीच नजिकच्या बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावेत.  अधिक माहितीसाठी आपल्या भागातील विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँक, “आपले सरकार सेवा केंद्र” (डिजीटल सेवा केंद्र)  यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्याचे कृषि मंत्री ना. पांडुरंग फुंडकर, यांनी केले आहे. 

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड