हवामान आधारीत फळपिक विमा योजना
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 13:- हवामान आधारीत आंबा फळपिक विमा योजना सन 2017-18 रायगड
जिल्ह्यातील अधिसूचित तालुक्यातील महसूल
मंडळात राबविण्यात येत आहे.
योजना कार्यान्वीण यंत्रणा-पंतप्रधान पिक विमा योजना रायगड जिल्ह्यात एच.डि.एफ.सी अॅग्रो जनरल इन्शुरन्स
कंपनी मार्फत राबविण्यात येणार आहे.
विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रात
नोंदविलेल्या हवामानाच्या तपशिलनुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर
नुकसान भरपाई देईल.आंबा पिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमा
संरक्षित कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पिक नुकसानीस (आर्थिक
)खालीलप्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.
विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी )तसेच प्रमाणके
(ट्रिगर)व नुकसान भरपाई रक्कम् प्रती हेक्टर रुपये-
अवेळी पाऊस-दि.1 जानेवारी,2018 ते 31मे,2018 – कमी तापमान-दि.1डिसेंबर
2017 ते 28 फेब्रुवारी 2018, अवेळी पाऊस-दि.16 एप्रिल,2018 ते 15 मे,2018 , जास्त तापमान-दि.15मार्च 2018 ते 31 मे-2018,
-विमा संरक्षित रक्कम रु.5500 प्रति हेक्टर
रु.110000/- तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता प्रति हेक्टर रु.5500/- तसेच
गारपीट-एक जानेवारी 2018 ते 30 एप्रिल
2018 विमा संरक्षीत रक्कम रु. 36,700/ तर शेतकऱ्यांनी भरावयाची विमा हप्ता प्रति हेक्टर-
रु 1835/-
समाविष्ट् जिल्हानिहाय हवामान धोके प्रमाणके (ट्रिंगर)व नुकसानप भरपाई रक्कम
प्रति हेक्टर् यामध्ये बदल असल्याने सविस्त्र माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयांशी
संपर्क साधावा. विमा धारक शेतकऱ्यांनी गारपीटमुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त
फळपिकाची माहिती विमा कंपनीस, संबंधित मंडळ
कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे.
योजनेतील सहभागी-
आंब्यासाठी पिक कर्ज घेतले आहे. अशा सर्व शेतकऱ्यांनाही
योजना सक्तीची राहील.मात्र गारपीट या हवामान धोक्यासाठी विमा ऐच्छिक राहील. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना हि योजनना ऐच्छिक राहील.
फळपिकाखाली किमान 20.0 हेक्टर किंवा जास्त उत्पादनक्षम क्षेत्र असणाऱ्या महसूल
मंडळात ही योजना राबविण्यात येते. मात्र मंडळ शासनामार्फत अधिसूचित होणे आवश्यक असते.
या योजना नोंदणीकृत विमा कंपनीमार्फत शिफारशीत जिल्ह्यातील आंबा पिकांसाठी अधिसूचित
केलेल्या महसूल मंडळ पातळीवर कार्यान्वित करण्यात येईल.
योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सामुदाईक सेवा केंद्र(सीएससी)मार्फत ऑनलाईन
अर्ज भरावेत सोबत 7/12,आधारकार्ड ,बँक खाते तपशिल आवश्यक आहे. योजनेत सहभाग घेण्यासाठी
अंतिम तारीख 31 डिसेंबर 2017 आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी,उपविभागीय कृषी अधिकारी, संबंधित
विमा कंपनी, कृषी विभाग संकेतस्थळ- www.krishi.maharashtra.gov.in येथे संपर्क साधावा. असे उपविभागीय
कृषी अधिकारी, रायगड अलिबाग यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000000
Comments
Post a Comment