विधानमंडळ विशेषाधिकार समितीची आज अलिबाग येथे बैठक
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2-
महाराष्ट्र विधानमंडळ विशेषाधिकार समितीची उद्या शुक्रवार दि.3 रोजी रायगड
जिल्हास्तरीय बैठक अलिबाग येथे आयोजित
करण्यात आली आहे. या बैठकीसाठी विधानमंडळातील अधिकारी व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी
आज यासंदर्भात आढावा घेतला.
विधानमंडळ विशेषाधिकार
समितीची बैठक शुक्रवार दि.3 रोजी सकाळी
साडेदहा वा. जिल्हा परिषदेच्या टिपणीस सभागृहात होणार आहे. या बैठकीच्या
अध्यक्षस्थानी समितीप्रमुख डॉ. नीलम गोऱ्हे या राहणार आहेत. यावेळी समिती सदस्य आमदार
सर्वश्री प्रा. अनिल सोले, गिरीशचंद्र व्यास, रविंद्र फाटक, रामराव वडकुते, ख्वाजा
बेग,ॲड. निरंजन डावखरे, डॉ. सुधिर तांबे, सुभाष झांबड, मरनाथ राजुरकर, प्रा. जनार्दन
चांदुरकर यांचीही उपस्थिती राहिल. याबैठकीस जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी व
विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी
यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठकीच्या पुर्वतयारी संदर्भात आढावा बैठक पार पडली.
निवासी उपजिल्हाधिकरी किरण पाणबुडे यांच्यासह
विधानमंडळाचे उपसचिव एन.जी. काळे, अवर सचिव उमेश शिंदे यांनी स्वतः बैठक
स्थळाची पाहणी केली व पुर्वतयारीचा आढावा घेतला.
उद्या होणाऱ्या बैठकीत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना
विधानमंडळाचे विशेषाधिकार व सदस्यांना द्यावयाच्या सौजन्यपुर्ण वागणुकीबाबत
शासनाने निर्गमित केलेल्या परिपत्रकातील तरतूदींनुसार प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन
करण्यात येणार आहे.
०००००
Comments
Post a Comment