क्षेत्र दुरुस्ती सुनावणीसाठी उपस्थितीचे आवाहन


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.24:- दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडोर अंतर्गत मौजे पाणसई ता. माणगाव येथील औद्योगिक क्षेत्र सऩं. 186/6/ब/2  येथील क्षेत्र दुरुस्तीसंदर्भात तहसिलदार माणगाव यांच्या कार्यालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीचे कामकाज  यासंदर्भात 29 जून, 18 सप्टेंबर 13 ऑक्टोंबर, 27 ऑक्टोंबर वेळी सुनावण्या झाल्या. तथापि यासुनावण्यांना सामनेवाला  श्रीमती जयश्री विनोदकुमार शहा या अनुपस्थित राहिल्या आहेत.  येत्या 14 डिसेंबर रोजी  सकाली साडेअकरा वा. पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली आहे. या सुनावणीस श्रीमती शहा यांनी सर्व कागदपत्रांसह उपस्थित रहावे. या सुनावणीस त्या उपस्थित न राहिल्यास त्यांना काहीही सांगावयाचे नाही असे गृहित धरुन  पुढील कारवाई करण्यात येईल, असे आवाहन तहसिलदार माणगाव यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान