पेण अर्बन बॅंकेचा एक रकमी कर्ज परतफेड योजनेचा ठराव


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.24:- पणन व वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन, यांचे निर्गमित परिपत्रकान्वये कर्जाची प्रभावीपणे वसुली व्हावी यासाठी बँकेच्या सर्व कर्जदारांसाठी शासनाने एकरकमी परतफेड योजना अमलात  आणण्याचा ठराव  दि. 22 नोव्हेंबर रोजीच्या सभेत करण्यात आला.
या एकरकमी परतफेड योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी 2018 पर्यंत  असून मुदतीत प्राप्त  अर्जांचा विचार केला जाईल. एकरकमी कर्ज परतफेड योजनेच्या शर्ती व अटीनुसार कोणत्याही कर्जदारांस यापुढे पुन्हा एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घेता येणार नाही.
तरी बँकेच्या सर्व थकीत कर्जदारांनी एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घेऊन आपली कर्जखाती बंद करावीत व तसा बेबाकी दाखला घेण्यात यावा, असे आवाहन प्रशासक मंडळ, दि.पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि. पेण यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक