महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे केंद्रीय अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20- विशेष केंद्रीय अर्थ सहाय्य  योजनेअंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रशिक्षणार्थिंकडून दि.24 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले असून दि.28 रोजी प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
  रायगड  जिल्ह्यासाठी  या आर्थिक वर्षाचे प्रशिक्षणाचे उदिष्ट् दोनशे भौतिक व 30.00 लाख आर्थिक असे देण्यात आलेले आहे.  या योजनेअंतर्गत कॉम्प्युटर ट्रेनिंग,ब्युटी पार्लर,फॅशन डिझायनिंग, मोबाईल रिपेअरींग,ॲटोमोबाईल रिपेअरिंग सेंटर सर्व्हिस, टि.व्ही., रेडिओ, टेपरोकॉर्डर माशिन, फेब्रिकेटर, वेल्डींग वर्कस, ड्रायव्हींग, फ्रीज, ए.सी.रिपेअरिंग, मोटर रिवांडींग, पेंटींग ऑटोमोबाईल या व्यवसायांचे प्रशिक्षण तीन महिने कालावधीसाठी दिले जाणार आहे. या प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना प्रतिमहा एक हजार रुपये  विद्यावेतन देण्यात येणार आहे. इच्छुकांनी प्रशिक्षणासाठी अर्ज भरुन दि.24 नोव्हेंबर पर्यंत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.जिल्हा रायगड,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळमजला, गोंधळपाडा अलिबाग यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन  महात्मा फुले मागासवर्ग विकास, महामंडळ (मर्या)चे रायगड जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक पी.सी. जगताप यांनी केले आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांमधून  योग्य प्रशिक्षणार्थी निवड करण्याकरीता दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कार्यालयात मुलाखत घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी कळविले आहे.
०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड