सनदी व प्रमाणित लेखापालांना आवाहन
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1:- वैधानिक
लेखापरिक्षण अंती शासनाकडे भरणा केलेले 20 टक्के
लेखापरिक्षण शुल्क् संबंधित सनदी, प्रमाणित लेखापरिक्षकांना अदा करण्याचे सुचित
केलेले आहे. तरी ठाणे,पालघर व रायगड जिल्ह्यातील संबंधीत सनदी,प्रमाणित
लेखापरिक्षक यांनी सहकारी पशु, दुग्ध व मत्स्य संघ संस्थांचे 20 टक्के
लेखापरिक्षण शुल्क शासनाकडे भरणा केलेल्या चलनांच्या प्रती व संस्थांची यादी
तात्काळ जिल्हा विशेष लेखा परिक्षक सहकारी संस्था, पदुम ठाणे या कार्यालयास सादर
करण्याचे आवाहन जिल्हा विशेष लेखापरिक्षक सहकारी संस्था पदुम, ठाणे गणेश शंकर
शिंदे, यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment