संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे : चर्मोद्योग प्रशिक्षण; इच्छुकांकडून अर्ज मागविले


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2-संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांचेमार्फत चांभार, ढोर,मोची,होलार या सर्व वर्गातील होतकरु तरुणांसाठी फरसतगंज,उत्तर प्रदेश येथे दोन महिन्याचे (डिसेंबर ते जानेवारी ) प्रशिक्षण योजना आयोजित करण्यात आली आहे. या चर्मोद्योग प्रशिक्षण योजना पुढीलप्रमाणे राबविण्यात येणार आहे.
Certificate Programm in Cutting Operator-Footwear
Certificate Programm in Closing Operator-Footwear
प्रशिक्षणासाठी अटी व शर्ती :
वय-लाभार्थ्यांचे वय 18 ते 35 वर्ष असावे.शैक्षणिक पात्रता-लाभार्थ्यांची शैक्षणिक पात्रता आठवी पास असावी.,
आवश्यक कागदपत्रे- जातीचा दाखला,जन्मतारखेचा दाखला,रेशन कार्ड,फोटो,आधारकार्ड
जिल्हा कार्यालयामार्फत लाभार्थ्यांचे  अर्ज वाटप, दाखल करण्याची  तारीख 13 ते 14 नोव्हेंबर
प्रत्येक जिल्ह्यात अर्जाची छाननी करण्याची मुदत दि. 16 ते 17 नोव्हेंबर पर्यंत राहील.
प्रत्यक्षपणे लाभार्थींची मुलाखत व निवड दि.20 ते 22 नोव्हेंबर पर्यंत आहे.
तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा. असे डी.डी.दुधडे, जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे. संपर्कासाठी मो.नं. 9987328204.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड