निवडणूक प्रश्नमंजूषा स्पर्धा-२०१७;खालापूरची आश्विनी जाधव प्रथम




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28-  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आंतरशालेय निवडणूक प्रश्न मंजूषा स्पर्धेचे (National Election Quiz, Inter School Contest 2017-18) आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरावर पार पडलेल्या या स्पर्धेत खालापुर येथील आश्विनी अन्साजी जाधव ही स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या शाळेची विद्यार्थिनी प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
आंतरशालेय निवडणूक प्रश्न मंजूषा स्पर्धा 2017-18 अंतर्गत रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये इ. 9 ते 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा सर्व तालुक्यांत घेण्यात आली. तालुकापातळीवर घेण्यात आलेल्या परीक्षेत 30 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  या विद्यार्थ्यांची एक जिल्हास्तरीय परीक्षा आज जनरल अरुण कुमार वैद्य हायस्कुल, अलिबाग येथे घेण्यात आली. या परीक्षेस  16 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या परीक्षेमध्ये कु. आश्वीनी अन्साजी जाधव, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, खालापुर ही विद्यार्थीनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तर आदित्य दिलीप दुधमल, व्हि. के. हायस्कुल, पनवेल हा विद्यार्थी व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. या दोन्ही विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र आणि सम्नानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या परीक्षेच्या आयोजनासाठी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रतिमा पुदलवाड व सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार श्रीमती गुरव आदींनी परीश्रम घेतले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड