ग्रा.पं. निवडणूकः मनाई आदेश जारी
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन 2017 चा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यामुळे दि.24 नोव्हेंबर पासून आचार संहिता अमलात आली आहे. रायगड जिल्ह्यात नवी मुंबई पोलीस हद्दीत परिमंडळ-2 पनवेल विभागातील उरण पोलीस ठाणे हद्दीत रायगड जिल्हा परिषदेतील उरण पंचायत समितीमधील चाणजे गणाच्या रिक्त पदासाठीची निवडणूक होणार आहे. मतदान दि.26 डिसेंबर रोजी होणार असून मतमोजणी 27 डिसेंबर रोजी होणार आहे. या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहून मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावे यासाठी पोलीस उप आयुक्त्, विशेष शाखा, नवी मुंबई यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1)मनाई आदेश् जारी अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात तसेच पंचायत समिती चाणजे गणाच्या कार्यक्षेत्रात शस्त्र परवानाधारकांना शस्त्रास्त्रे घेवून फिरण्यासाठी मनाई आदेश लागू केले आहेत.प्रत्येक शस्त्र परवानाधारकास आदेशापूर्वी नोटीस बजावणे शक्य नसल्याने फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144(2)अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदर आदेश एकतर्फी काढण्यात आला आहे. हे आदेश दि.27 डिसेंबर रोजी रात्रौ 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहतील. या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या शस्त्र परवानाधारकांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांनी दिला आहे.
०००००
Comments
Post a Comment