लोकशाही दिनात 8 अर्ज प्राप्त
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.1- जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या
अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आज झालेल्या लोकशाही
दिनामध्ये 8 अर्ज प्राप्त झाले आहेत.
यामध्ये महसूल विभाग- 3 सह
जिल्हा निबंधक जिल्हा मुद्रांक रायगड-अलिबाग-1, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था
रायगड-अलिबाग -1, प्रकल्प संचालक, पनवेल-इंदापूर प्रकल्प, भारतीय राष्ट्रीय
राजमार्ग प्राधिकरण, चिंचपाडा, कळंबोली बायपास रोड, पनवेल-1, जिल्हा अधिक्षक भूमी
अभिलेख रायगड-अलिबाग-1 व महानगरपालिका पनवेल-1 असे एकूण 8 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील महसूल विभाग यांचा 1 अर्ज जागीच निकाली
काढण्यात आले.
मागील प्रलंबित अर्ज 10 आणि आजचे 7 असे एकूण 17 अर्ज प्रलंबित आहेत. यात महसूल विभाग-6, मुख्य कार्यकारी अधिकारी
रायगड जिल्हा परिषद-1, मुख्य नियंत्रक अनाधिकृत बांधकाम (सिडको)-2, अधिक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत
वितरण कंपनी पेण-1., सह जिल्हा निबंधक जिल्हा मुद्रांक रायगड-अलिबाग-1, जिल्हा
उपनिबंधक सहकारी संस्था रायगड-अलिबाग -1, प्रकल्प संचालक, पनवेल-इंदापूर प्रकल्प,
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, चिंचपाडा, कळंबोली बायपास रोड, पनवेल-1,
जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख रायगड-अलिबाग-1 व महानगरपालिका पनवेल-1. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
रायगड अभय यावलकर, अपर पोलीस अधिक्षक संयजकुमार पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकरी
(सा.प्र.) जि.प.रायगड प्रकाश खोपकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे विविध
शासकीय विभागाचे अधिकारी
उपस्थित होते.
0000
Comments
Post a Comment