सायबर विश्वात वावरतांना खबरदारी आवश्यक --जिल्हा पोलीस अधिक्षक पारस्कर
अलिबाग,जि. रायगड
(जिमाका) दि.23- इंटरनेटच्या माध्यमातून समाजमाध्यमांत वावरतांना, आर्थिक व्यवहार
करतांना खबरदारी आवश्यक आहे. त्याद्वारेच आपण सायबर विश्वात आपली फसवणूक टाळू शकतो, त्यासाठीच सायबर जनजागृती आवश्यक
आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी आज येथे केले.
ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत रायगड जिल्हा पोलीस व
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड यांनी संयुक्त पणे माध्यम प्रतिनिधींसाठी सायबर
जनजागृती कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे उदघाटन जिल्हा पोलीस
अधिक्षक यांच्या हस्ते आज पोलीस अधिक्षक कार्यालयातील कॉन्फरन्स सभागृहात करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधिक्षक
संजयकुमार पाटील, सायबर गुन्हे शाखेचे पी. आय. एन.एम.गवारे, पी.एस.आय. शिवसांभ
ईश्वर स्वामी, पीआरओ एपीआय आर.एन.राजे, प्रभारी
जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, एस.जे.भोईर,जे.व्ही.पाटील तसेच माध्यम
प्रतिनिधी उपस्थित होते.
लोकराज्यच्या 'आपले पोलीस आपली अस्मिता' या विशेषांकाचे विमोचन
श्री. पारसकर व श्री. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. श्री. पारस्कर म्हणाले की
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. त्यासाठी ट्रान्सफॉर्मिंग
महाराष्ट्र या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायबर गुन्हे आर्थिक गुन्हे होत असतात शिवाय स्पेशल मिडियात
वावरतांना आपल्या वर्तनाने समाजात जातीय तेढ निर्माण होणार नाही. याची दक्षता घेणे
आवश्यक आहे.यावेळी कार्यशाळेत माध्यमकर्मींना सायबर सुरक्षा, सिटीझन पोर्टल,
मोबाईल ॲप विषयक माहिती सादरीकरणाद्वारे पीएसआय स्वामी यांनी सादर केली. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची
उत्तरे देण्यात आली. प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी
प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.
000000
Comments
Post a Comment