राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील खेळाडुंसाठी पारितोषिक


            अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.23-  केरळ येथे सन २०१५ मध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या राज्यातील खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर रोख बक्षिस देऊन त्यांचा गौरव करण्यास शासनाने घेतला आहे.
त्यानुसार संबंधित खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांनी प्राविण्य प्रमाणपत्र, पॅन व आधार कार्ड, बँक पासबुकचे पहिले पान (सर्वांच्या झेरॉक्स प्रत), मुळ रद्द केलेला चेक, मुळ मार्गदर्शक संमती पत्र इ. तसेच मार्गदर्शकांनी रहिवासी दाखला, पॅन व आधारकार्ड झेरॉक्स प्रत, बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, मुळ रद्द केलेला चेक इ. संचालनालयास दि. 25 पर्यंत सादर करावा व आगाऊ प्रत संचालनालयाच्या dsysdesk6@gmail.com या ई-मेल वर पाठवावी. तसेच याबाबत अधिक माहितीकरीता क्रीडा व युवक सेवा संचालनालय, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे किंवा आपल्या जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड