जिल्ह्यात 14 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालत




अलिबाग,जि. रायगड,(जिमाका)दि.15-राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवार दि. 14 एप्रिल रोजी रायगड जिल्ह्यात सर्व न्यायालयामध्ये आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमधून जिल्ह्यातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीने या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे,मोटार अपघात प्रकरणे,दिवाणी प्रकरणे 138 एन.आय ॲक्ट् खालील प्रकरणे,दिवाणी अपिले, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे व अपिले ठेवली जाणार आहेत. तसेच विज वितरण विभाग, नगरपालिका,ग्रामपंचायत, भारत दूर संचार निगम यांच्या पाणीबिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे सदर लोकअदालतीध्ये ठेवली जाणार आहेत. याबरोबरच राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था यांचेकडील थकबागीबाबत वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
या लोकन्यायालयात प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यय होत नाही. पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो तसेच जास्तीत जास्त् प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे तसेच  या लोकअदालतीचा जास्तीत जास्त् लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश मु.गो.सेवलीकर प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग,यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन