ग्राहक शिबिरात ग्राहकांच्या हक्कांविषयी मार्गदर्शन
अलिबाग,जि.
रायगड, (जिमाका)दि.23-जिल्ह्यातील ग्राहकांसाठी आज पुरवठा
शाखेतर्फे आयोजित ग्राहक शिबिरात ग्राहकांच्या हक्कांविषयी तज्ज्ञ
मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय रायगड आणि
भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्ह्यातील
ग्राहकांसाठी कर्नाळा सभागृह, पोलिस कवायत मैदान
येथे ग्राहक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.
यावेळी भारतीय ग्राहक मार्गदर्शन
संस्थेचे सचिव डॉ. एम.एस. कामत यांनी तसेच संतोष आढाव, श्रीमती तृप्ती राऊळ, विक्रांत जिंदाल यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा
पुरवठा अधिकारी एल.एम. दुफारे हे यावेळी उपस्थित होते. यावेळी ग्राहकांना प्रत्येक
खरेदीच्या वेळी जागरुक राहण्याविषयी तसेच
संभाव्य फसवणूकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हक्क व नुकसान भरपाईबाबत टोल फ्री
क्रमांक 1800222262 वर संपर्क करण्याबाबत सांगण्यात आले. तसेच विविध प्रकारच्या गुंतवणूक, म्युच्युअल
फंड, पोस्ट, जमिन , एलआयसी याबाबत सविस्तर मार्गद्र्श करण्यात आले. तसेच अन्न
पदार्थ व त्यातील भेसळ याबाबतही ग्राहकांना मार्गदर्शन करण्यात आले.
०००००
Comments
Post a Comment