माजी सैनिक पाल्यांसाठी मोफत वसतीगृह


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23- राज्यातील युद्ध विधवा,माजी सैनिक विधवा,आजी, माजी सैनिक व इतर नागरिकांच्या पाल्यांना सैनिकी मुलांच्या वसतिगृहात प्रवेशासाठी सैनिकी मुलांचे वसतिगृह,नवेनगर महाड येथे शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी प्रवेश अर्ज देणे सुरु आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 15 जुलै पर्यंत आहे. यासाठी युद्ध विधवांचे पाल्याना विना शुल्क आणि  माजी सैनिक विधवा, आजी,माजी सैनिकांचे पाल्य् व इतर नागरिकांचे पाल्याकरीता अति अल्प् भोजन शुल्क आकारुन इयत्ता नववी पासून पदविका, पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या  पाल्यांना सैनिकी वसतिगृहात प्रवेश देण्यात येईल. शिस्त् बद्ध सैनिकी वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज मुलांचे वसतिगृह, नवेनगर,महाड येथे वसतिगृह अधिक्षक यांच्याकडे उपलब्ध आहेत.
तरी जास्तीत जास्त् सैनिकी मुलांना याचा लाभ मिळावा, अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 2145-225451 व 02141-222208 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ प्र. जाधव(निवृत्त) यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान