जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 21 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 21.33 मि.मि इतक्या पावसाची नोंद
झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 373.10 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
नियंत्रण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची
नोंद याप्रमाणे-
अलिबाग 3.00 मि.मि., पेण-2.00 मि.मि.,
मुरुड-17.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि.,
खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-49.00 मि.मि., रोहा-5.00 मि.मि., सुधागड-6.00
मि.मि., तळा-12.00 मि.मि., महाड-15.00 मि.मि., पोलादपूर-13.00,
म्हसळा-100.20मि.मि., श्रीवर्धन-70.00 मि.मि., माथेरान-49.00 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 341.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 21.33 मि इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 11.87 % इतकी आहे.
०००००
Comments
Post a Comment