जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 98 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 98.44 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 351.77 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान
अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 124.00 मि.मि., पेण-130.00 मि.मि.,
मुरुड-210.00 मि.मि., पनवेल-55.20 मि.मि., उरण-138.00 मि.मि., कर्जत-78.70 मि.मि.,
खालापूर-62.00 मि.मि., माणगाव-65.00 मि.मि., रोहा-128.00 मि.मि., सुधागड-51.50
मि.मि., तळा-129.00 मि.मि., महाड-58.00 मि.मि., पोलादपूर-31.00, म्हसळा-125. 60मि.मि.,
श्रीवर्धन-130.00 मि.मि., माथेरान-59.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1575.00
मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 98.44 मि इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 11.19 % इतकी आहे.
०००००
Comments
Post a Comment