महाड येथे वृक्षारोपण व मुल्यमापन पाहणी अभ्यास राज्यस्तरीय प्रशिक्षण संपन्न



अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.21- महाराष्ट्र शासनाचे 13 कोटी वृक्ष लागवड या संकल्पनेतून वृक्ष लावगड मोहिम जिल्हाभरात वेगवेगळ्या ठिकाणी राबविण्यात येत आहे. जिल्हा नियोजन विभागामार्फत महाड येथे काल (दि.20) रोजी शासकीय गोदाम परिसरात अपर संचालक मुल्यमापन मुंबई विजय आहेर यांच्या हस्ते वृक्षरोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास उपायुक्त नियोजन, कोकण विभाग बापूसाहेब सबनिस, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव आदि उपस्थित होते.
वृक्षारोपण कार्यक्रमानंतर महाड येथे मुल्यमापन पाहणी अभ्यास राज्यस्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत विविध कामांची मुल्यमापन सन 2018-19 मध्ये आयोजित करावयाचे आहे. या प्रशिक्षणासाठी कोकण विभागातील सर्व जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत