जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 21.19 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.14- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 21.19 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2441.73 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार
तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 2.00
मि.मि., पेण-15.00 मि.मि., मुरुड-5.00 मि.मि., पनवेल-31.40 मि.मि., उरण-6.00
मि.मि., कर्जत-16.80 मि.मि., खालापूर-18.00 मि.मि., माणगांव-40.00 मि.मि.,
रोहा-28.00 मि.मि., सुधागड-9.00 मि.मि., तळा-32.00 मि.मि., महाड-24.00 मि.मि.,
पोलादपूर-29.00, म्हसळा-11.50मि.मि., श्रीवर्धन-5.00 मि.मि., माथेरान-66.40
मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 339.10 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 21.19 मि.
मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 77.70 टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment