अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती; 30 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले



अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.14-अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी  मा.पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार राज्यातील मुस्लिम,ख्रिश्चन,बौद्ध,शीख,पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्यांक इयत्ता पहिली ते दहावी  च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनेची शैक्षणिक वर्ष 2008 ते 2009- पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे सन 2018-19 या वर्षासाठी इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकणाऱ्या पात्र नवीन व नुतनीकरण विद्यार्थ्यांनी केवळ ऑनलाईन पद्धतीने शिष्यवृत्ती अर्ज रविवार दि.30 सप्टेंबर पर्यत www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरुन भरावयाचे आहेत.
इयत्ता पहिली ते दहावी च्या सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी अनुदानीत, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत व स्वयं अर्थ सहाय्यिता मान्यताप्राप्त् शाळांकडून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी 50 टक्के पेक्षा जास्त् गुणाने उत्तीर्ण झालेला असावा. तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणाची अट लागू राहाणार  नाही. पालकांचे वार्षिक उत्पन्न् रुपये एक लाखापेक्षा कमी असावे. एका कुटूंबातील 2 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही. अर्ज भरतांना विद्यार्थ्यांचा धर्म, कुटूंबाचे उत्पन्न, गुण व टक्केवारी इत्यादी माहिती अचूक भरावी.धर्म, उत्पन्न,गुणपत्रक, आधारकार्ड, विद्यार्थ्याचा फोटो, बँक पासबुक च्या पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे मुख्याध्यापकांना सादर करावीत.(विद्यार्थ्यांचे बँक खाते उपलब्ध नसेल तर पालकांच्या बँक खात्याची माहिती अर्जात भरता येईल परंतू हे बँक खाते क्रमांक फक्त दोन पाल्यांसाठी वापरता येईल.), पालकांचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे.ह्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतर तत्सम शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा.एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी 30 टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थीनींसाठी राखीव आहे. सन 2017-18 मध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या शिष्यवृत्ती मिळालेल्या  आणि यावर्षी शिष्यवृत्तीच्या अटी पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी सन 2018-19 करिता नुतनीकरण विद्यार्थी म्हणून अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. नवीन अथवा नुतनीकरण यापैकी एकाच प्रकरचा अर्ज विद्यार्थ्यांना भरता येईल. तसेच एका विद्यार्थ्याने नवीन, नुतनीकरणासाठी दोनदा अर्ज भरला असेल तर असे अर्ज बाद ठरवले जातील.इयत्ता पहिली ते दहावी मधील विद्यार्थ्यांचे नवीन व नुतनीकरणे अर्ज National Scholarship Portal (NSP 2.0) www.scholarships.gov.in हे संकेतस्थळावर अर्ज भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची राहील. (टिप-हे अर्ज भरण्याची सोय www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे.) शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरतांना विद्यार्थ्यांचा आधारकार्ड आवश्यक आहे. व तो क्रमांक विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी संलग्न केलेले असणे बंधनकारक आहे. (टिप-आधारकार्ड नसल्यास आधार नोंदणी पावती, फोटोसहीत असलेली बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, रेशनकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, शाळेचे ओळखपत्र (शाळेच्या शिक्क्यासह) व वाहनचालक परवाना यापैकी एकाची प्रत शाळेत ओळख म्हणून जमा करणे आवश्यक आहे.) अर्ज भरतांना भ्रमणध्वनी  क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. हा क्रमांक पालकांचा असेल तर तो दोन पाल्यांसाठीच वापरता येईल, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भाऊसाहेब थोरात, रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड