मच्छिमारांना खबरदारीची सुचना
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13-जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे येत्या बुधवार दि. 15 पर्यंत
वादळीवाऱ्यामुळे समुद्र खवळलेल्यास्थितीमध्ये राहणार असून किनारपट्टीवरील सखल
भागामध्ये उधानामुळे व अतिवृष्टीमुळे पाणी भरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे
खबरदारी म्हणून जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी इंडियन कोस्ट गार्ड, मुरुड यांनी
समुद्रात तीव्र लाटांमुळे मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जावू नये, जे
मच्छिमार मासेमारीसाठी गेले आहे त्यांनी तात्काळ सुरक्षित बंदराचा आश्रय घ्यावा,
अशी पूर्वसूचना दिली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीस समोरे जाण्यासाठी आपल्या
विभागाकडील बचाव पथक, साहित्य्, रुग्णवाहिका, रुग्णालये इ.सुविधा तत्पर व सतर्क
ठेवण्यात याव्यात. नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात यावेत. जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास 02141- 222118, 222097,222322,9763646326 या
क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड- अलिबाग यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment