पोलीस स्मृती दिनानिमित्त हुतात्म्यांना मानवंदना



अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.21 : पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्य पार पाडीत असताना आपल्या प्राणाची आहुती दिली त्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ पोलीस मुख्यालय अलिबाग येथे राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी आज सकाळी ८ वाजता पोलीस मुख्यालय येथे स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना मानवंदना दिली.
 यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल  पारसकर, अपर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ तसेच पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन