जिल्ह्यातील दुष्काळसदृष्य तीन तालुक्यात सवलती लागू


अलिबाग,जि. रायगड, दि.30,(जिमाका)-  राज्य शासनाने राज्यातील काही तालुक्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती  जाहीर केली आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड व श्रीवर्धन हे तीन तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने उपाययोजना व सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार,  राज्यातील सन 2018-19 च्या खरीप हंगामातील पाहणी निकषांनंतर लागू झालेल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड, श्रीवर्धन या तीन तालुक्यांत  शासनाने दि.23 ऑक्टोबर रोजी शासन निर्णयाद्वारे दुष्काळ सदृष्य परिस्थिती  जाहीर केली आहे. त्यानुसार या तीन तालुक्यात जमीन महसूल सूट,  सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीत स्थगिती,  कृषीपंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सूट, शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकर्सचा वापर,  टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या  सवलती लागू करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सूयवंशी यांनी तीनही तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणांना निर्देश दिले असल्याचे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड