राष्ट्रीय एकता दौड; आबालवृद्धांचा सहभाग जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन व एकात्मता शपथ
अलिबाग,जि.
रायगड, दि.30,(जिमाका)-सरदार वल्लभाई पटेल यांच्या
जयंतीनिमित्त जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित राष्ट्रीय
एकता दौड 2018 मध्ये अलिबाग शहर व परिसरातील आबालवृद्ध
धावपटूंनी सहभाग घेतला व दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने
जिल्हा पोलीस दलामार्फत अलिबाग शहरात मॅरोथॉन दौडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर प्रथम सर्वाना एकात्मतेची
शपथ देण्यात आली. त्यानंतर
आलिबाग समुद्रकिनाऱ्यावरून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर,
पोलीस अधीक्षक श्री. अनिल पारस्कर आदिंनी झेंडा दाखवून रॅलीस
मार्गस्थ केले. यात पुरुष, महिला, जेष्ठ नागरिक, आर.एस.पी.विद्यार्थी
यांनी सहभाग घेतला होता. सदर एकता दौड 5 किलोमीटरची अंतराची होती व त्यात प्रत्येक
गटातील प्रथम तीन विजेत्यांना
मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व मेडल देवून गौरवण्यात आले. राष्ट्रीय एकता
दौडला अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव
कसगावडे, उपवनसंरक्षक मनिष कुमार,
अॅड.महेश मोहिते, जिल्हा कारागृह अधिकारी ,पत्रकार तसेच पोलीस दलातील अधिकारी व
कर्मचारी तसेच सर्व क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन व एकात्मता शपथ
जिल्हाधिकारी
कार्यालयात देशाचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व माजी
पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी
निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपजिल्हाधिकारी रोहयो रविंद्र मठपती, चिटणीस
दौंडकर आदी मान्यवर तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी
उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली.

Comments
Post a Comment