राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा 2018-19 खेळाचे नैपुण्य जपणे आवश्यक- निवासी उपजिल्हाधिकारी पाणबुडे

        अलिबाग,जि. रायगड,दि.11(जिमाका)- सध्याच्या विज्ञान युगात खेळाला अतिशय महत्व असून खेळाडूने खिलाडू वृत्तीने  खेळ खेळावे व आपले क्रीडा नैपूण्य जपावे, खेळाडू हा वैयक्तिक आयुष्यात सर्वच क्षेत्रात निश्चितपणे यशस्वी होतो, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.किरण पाणबुडे यांनी  राजस्तरीय शालेय किकबॉक्सिंग क्रीडा स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी केले.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतिने सन 2018-19 मधील किक बॉक्सिंग या क्रीडा प्रकाराची राजस्तरीय राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा परिषद, रायगड-अलिबाग यांच्यावतीने दि. 11 ते 13 डिसेंबर या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली, अलिबाग येथे संपन्न होत आहे. या स्पर्धांमध्ये राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातुर, मुंबई, पुणे, कोल्हापूर व शिवछत्रपती क्रीडापीठ अशा एकुण 9 विभागातून जवळपास 500 खेळाडू, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी झाले आहेत.
            यावेळी अमॅच्युअर महाराष्ट्र किकबॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष संतोष म्हात्रे, किकबॉक्सिंग  असोसिएशन ऑफ महाराष्ट्र महासचिव प्रदिप शिंदे, सत्यपाल राऊत, रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष मंदार पनवेलकर, सचिव प्रविण पाटील, महादेव काकडे,  जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, आंतरराष्ट्रीय पंच प्रविण काळे आदि उपस्थित होते. या स्पर्धेच्या प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते स्पर्धेचा ध्वज फडकविण्यात आला. तर तेजस्विनी मळेकर, रायगड जिल्ह्याची राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या खेळाडूने स्पर्धेतील खेळाडूंना शपथ दिली. क्रीडा अधिकारी सचिन निकम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
निवासी उपजिल्हाधिकारी पाणबुडे पुढे म्हणाले की, सध्याच्या विद्यार्थी दशेतील खेळाडूंच्या मैदानी खेळांची  जागा  मोबाईल व टिव्हीने घेतली आहे.  खेळाडूंनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून खेळामध्ये सहभाग घेऊन उत्तम कामगिरी करावी व खेळाचे नैपुण्य जपावे.   
यावेळी स्पर्धेतील खेळाडूंनी किकबॉक्सिंग खेळाची प्रात्यक्षिकेही दाखविण्यात आली.
आजचे निकाल:-
14 वर्षाखालील मुले- 24 किलोखालील – 1) अर्णव भालेराव, पुणे 2) सुरज गोंडे, मुंबई 3) जय तुपे, औरंगाबाद 3) रोहन गुडार, कोल्हापूर 28 किलोखालील- 1) आर्यण सोनवणे, मुंबई 2) हार्दिक वाघमारे, पुणे 3) शाहिद शेख, कोल्हापूर  3) अमर दांडेकर, नागपूर 32 किलोखालील- 1) आकाश खर्डे, पुणे 2) अब्दुल शेख, लातूर 3) नंदु निचडे, नागपूर 3) सुदेश पाठक, नाशिक 37 किलोखालील- 1) विश्वतेज बिचुकले, पुणे 2) निल वैद्य, मुंबई 3) वरदराज चव्हाण, कोल्हापूर 3) प्रणव जंगाले, लातूर 42 किलोखालील- 1) ओंकार गायकवाड, पुणे 2) तेजस गोंडसे, अमरावती 3) सिध्देश टिक्का, मुंबई 3) ओम आव्हाड, नाशिक 52 किलोखालील- 1) इलियाझ पठाण, पुणे 2) सिध्दांत पांडे, मुंबई 3) अविनाश पाटील, औरंगाबाद 3) वल्लभ व्यास, अमरावती 57 किलोखालील- 1) अमन पवार, मुंबई 2) साहिल जाधव, औरंगाबाद 3) मनोमय गोयंका, नागपूर 3) सनी सिंग, नाशिक 63 किलो खालील- 1) आर्यन पवार, औरंगाबाद 2) सुजय काळे, पुणे 3) मयांक जाधव, मुंबई 3) पठाण नुर, नाशिक 63 किलो वरील- 1) साईश कुलकर्णी, मुंबई 2) अंकित पुरी, पुणे 3) यश माने, लातूर 3) मिहिर ठाकरे, अमरावती
17 वर्षाखालील मुले- 40 किलोखालील- 1) योगेश सावंत, मुंबई 2) सौरभ गोमे, पुणे 3) संदेश घुले, औरंगाबाद 3) अरहम जफर खान, अमरावती 45 किलोखालील- 1) अभय लिंबळे, पुणे 2) सुरेश राठोड, मुंबई 3) आदित्य दहिफळे, लातूर 3) राज पुरील, नागपूर.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड