गोवर रुबेला लसीकरण मोहिम: जिल्ह्यात आजअखेर 4 लाख 38 हजार बालकांना लसीकरण
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.18- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने
सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत मंगळवार दि.27 पासून गोवर
रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानात रायगड जिल्ह्यात सोमवार (दि.17 डिसेंबर) अखेर जिल्ह्यातील 4 लाख 38 हजार 682 बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले
असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त
अहवालानुसार काल (सोमवार दि.17) दिवसाअखेर
जिल्ह्यातील 107 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 19 शाळांमध्ये जिल्हा
शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 1594 विद्यार्थ्यांना तर 93
शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 13 हजार 436
विद्यार्थ्यांना अशा एकूण 15 हजार 30 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यात 7
हजार 699 मुले व 7 हजार 361 मुलींचा समावेश आहे.
तर मोहिम सुरु झाल्यापासून आज अखेर एकूण 2 लाख 28 हजार 104 मुले व 2 लाख 10
हजार 578 मुली असे एकूण 4 लाख 38 हजार 682 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात
आले, अशी माहिती जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ.सचिन देसाई यांनी दिली आहे.

Comments
Post a Comment