जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 21 रोजी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- महिलांना आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडता यावी यासाठी जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याचा 3 रा सोमवार हा महिला लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येतो.  त्याअनुषंगाने जानेवारी महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि.21 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडित महिलांनी विहित नमुन्यातील अर्ज, त्या सोबत आवश्यक कागदपत्र अरावे.  न्याय प्रविष्ठ प्रकरणे,विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदापत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर इत्यादी विषयावरील अर्ज स्विकारले जात नाहीत.   अधिक माहितीसाठी महिलांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, डॉ.वाजे हॉस्पिटल शेजारी, श्रीबाग नं.2, रायगड-अलिबाग, (दूरध्वनी क्र.02141-225321) वर प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एम.डी.गायकवाड यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत