मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी मोफत वसतीगृह सुविधा
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.10- सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय
विद्यार्थींनीकरिता मुलींचे शासकीय वसतिगृह हे गोंधळपाडा अलिबाग येथे कार्यरत आहे.
येथे इयत्ता 8 वी पासून गरीब, हुशार, होतकरु, मागासवर्गीय अनु.जाती 80 टक्के,
अनु.जमाती 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5 टक्के, आर्थिक मागास व इतर
मागास वर्गीय दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील विद्यार्थी 5 टक्के, विशेष मागास
प्रवर्ग 2 टक्के, अनाथ 2 टक्के व अपंग 3 टक्के यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला
जातो. वसतिगृहात विद्यार्थ्यांकरिता मोफत
निवास व भोजन व्यवस्था आहे. वह्या, पुस्तके,शैक्षणिक व लेखन साहित्य विनामूल्य
पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा रु.600/-
निर्वाहभत्ता दिला जातो. शालेय व गणवेश
पात्र विद्यार्थीनींना दोन संचाकरिता गणवेश भत्ता, रेनकोट, छत्री भत्ता दिला
जातो. या व्यतिरिक्त संगणक,ग्रंथालय
सुविधा, क्रीडासाहित्य, मनोरंजन इ.अनेक सुविधा उपलब्ध आहेत. प्रवेशपात्र विद्यार्थीनींच्या पालकांचे सर्व
मार्गानी मिळून उत्पन्न, अनु.जाती, अनु.जमाती विद्यार्थीनीकरिता रुपये 2 लाख चे आत
व विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थीनीकरिता रु. 1 लाख चे आत
असावे.
ऑनलाईन प्रवेश अर्जासोबत तहसिलदार
यांचे सहीचा सन 2019-20 मधील उत्पन्नाचा दाखल्याची सत्यप्रत. जातीचे मुलकी अधिकाऱ्याचे प्रमाणपत्रकाची
सत्यप्रत. मागील इयत्ता पास झाल्याचे
गुणपत्रकाची सत्यप्रत. आधारकार्डची सत्यप्रत.
शाळा,कॉलजेचे बोनाफाईङ या आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक
आहे. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृहात प्रवेश अर्ज हे ऑनलाईन फॉर्म
भरण्याकरिता व अधिक माहितीसाठी
वसतिगृहाच्या गृहपाल यांचेशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे मागासवर्गीय व
आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकीय वसतिगृह अलिबाग येथील गृहपाल श्रीमती
यु.एस.गुजेला यांनी कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment