पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम



अलिबाग, जि. रायगड, दि.14 (जिमाका)- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक तथा पालकमंत्री रायगड हे  जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
            शुक्रवार दि. 14 रोजी दुपारी पावणे चार वा. पनवेल येथे आगमन. दुपारी चार वा. विस्तारकांसमवेत बैठक. स्थळ:भाजपा कार्यालय, पनवेल. सायं.पाच वा. पनवेल येथून महाडकडे प्रयाण. सायं.साडे सात वा. एम.आय.डी.सी. विश्रामगृह महाड येथे आगमन व राखीव.
            शनिवार दि. 15 रोजी सकाळी सहा वा. महाड येथून किल्ले रायगडकडे प्रयाण. सकाळी सात वा. किल्ले रायगड येथे आगमन व छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक सोहळ्यास उपस्थिती. सकाळी नऊ वा. किल्ले रायगड येथून  अलिबागकडे प्रयाण.  सकाळी साडे अकरा वा. शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे आगमन व राखीव.  दुपारी बारा वा.  मौजे रासळ येथील कंत्राटी कामगारांच्या समस्यांबाबत बैठक. स्थळ: राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड, दुपारी साडे बारा वा. एचओसी रसायनी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याबाबत बैठक. स्थळ : राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड दुपारी   एक ते तीन राखीव. दुपारी तीन वा. जिल्हा नियोजन समितीची बैठक.  स्थळ : राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड,  सायं. पाच वा. अलिबाग येथून पलावा डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान