राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम जिल्ह्यात रविवारी (19 जानेवारी) रोजी लसीकरण----निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे




अलिबाग, जि. रायगड, दि.07 (जिमाका)-  राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवार दि.19 रोजी   जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असून ग्रामीण भागातील 52 प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचप्रमाणे शहरी भागात बुथ उभारण्यात येणार असून सदर बुथवर या दिवशी सकाळी  8.00 ते सायं.5.00 या वेळात  0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी आज येथे दिली.
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉक्टर्स  उपस्थित होते.
 यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी यंत्रणानिहाय पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्यावेळी माहिती देण्यात आली की,  जिल्ह्यातील  ग्रामीण व शहरी भागातील अपेक्षित लाभार्थी 1 लाख 88 हजार 850 त्याकरिता ग्रामीण भागात 2 हजार 706 आणि शहरी भागात 142 असे एकूण  2 हजार 848 बुथवर लसीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.   या व्यतिरिक्त रेल्वे स्थानक,इत्यादी ठिकाणी सुध्दा लस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.  या कार्यक्रमासाठी 6 हजार 335 आरोग्य कर्मचारी  यांची बुथवर नेमणूक करण्यात आलेली असून अंगणवाडी सेविका,आशा,शिक्षक तसेच खाजगी संस्थांचा देखील यामध्ये सहभाग घेण्यात आलेला आहे.   0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ सारख्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी या लसीचा डोस देणे अत्यंत आवश्यक आहे याकरिता 0 ते 5 वर्षाखालील  सर्व बालकांना या दिवशी पोलिओची लस पाजून कार्यक्रमात सहभागी व्हावे व सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच शहरी भागातील गर्दीच्या वस्त्यात तसेच झोपडपट्टी भागात विशेषत्वाने काळजीपूर्वक लसीकरण करावे, असे निर्देशही निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी दिले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड