पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा दौरा कार्यक्रम




            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25- उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे.
            रविवार दि.26 जुलै, 2020 दुपारी 2.30 वा. मंडणगड जि.रत्नागिरी येथून मोटारीने महाड, जि.रायगडकडे प्रयाण. दु.3.00 वा. महाराष्ट्र राज्य उद्योग विकास महामंडळाचे शासकीय विश्रामगृह, महाड येथे आगमन व राखीव. दु.3.15 ते 4.15 वा.के.एस.एफ.कॉलनी महाड येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे प्रस्तावित कोविड केअर सेंटरची पाहणी.  सायं.5.15 वा. उपजिल्हा रुग्णालय, रोहा येथे कोविड केअर सेंटरची पाहणी. सोयीनुसार सुतारवाडी ता.रोहा येथे आगमन व राखीव.
            सोमवार दि.27 जुलै 2020 रोजी सकाळी 11.00 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून नागोठणेकडे रवाना. स.11.45 वा. नागोठणे येथील प्रस्तावित रिलायन्स कोविड केअर सेंटरला भेट. दुपारी 2.00 वा. मु.डिकसळ ता.कर्जत येथे आगमन व प्रस्तावित डेडिकेटेड कोविड-19 हेल्थ सेंटरची पाहणी व अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. सोयीनुसार मुंबईकडे रवाना.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान