खानाव येथील आरोग्यवर्धिनी दवाखान्यास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली भेट




अलिबाग, जि.रायगड, दि.14 (जिमाका) : ऑल इंडिया रिहॅबिलिटेशन फोरम पुणे यांच्यामार्फत उभारण्यात आलेल्या खानाव येथील आरोग्यवर्धिनी दवाखान्यास जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आज भेट दिली. आदिवासी व गरीब लोकांसाठी मोफत सुरू केलेल्या दवाखान्याची पाहणी केली. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या रुग्ण व नागरिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रांत अधिकारी श्रीमती शारदा पवार,तहसिलदार सचिन शेजाळ यासोबतच ऑल इंडिया रिहॅबिलिटेशन फॉर्म यांचे प्रमुख साजिद सय्यद, श्री. भोसले आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या शेवटी गावकऱ्यांच्या वतीने माजी सरपंच श्री. अनंत गोंधळी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड