गतिमंद-मतिमंद बालिका सापडली आहे संबंधितांनी जिल्हा महिला व बालविकास कार्यालय अथवा कर्जत पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा




अलिबाग, जि.रायगड, दि.15 (जिमाका) :  एक गतिमंद-मतिमंद बालिका (वय अंदाजे 16 ते 18 दरम्यान) मौजे चारफाटा कर्जत येथे श्री. स्वप्निल नाथा भालीवले (सामाजिक कार्यकर्ता) यांना दि.28 जून 2020 रोजी सापडली आहे. या बालिकेबाबत सर्व ठिकाणी विचारपूस केली असता ती कोणाच्याही ओळखीची नसल्याचे आढळून आले आहे. श्री स्वप्नील भालीवले यांनी कर्जत पोलिस ठाणे यांना कळविले असून पोलिसांनी तिला तिचे नाव गाव विचारले असता या मुलीला तिचे स्वत:चे व पालकाचे नाव सांगता येत नसून तिच्याकडून कोणतीही उपयुक्त माहिती मिळू शकलेली नाही. या बालिकेस बाल कल्याण समितीच्या आदेशाने आसरा शेल्टर, नेरळ या बालगृहात दाखल करण्यात आले आहे.
  समुपदेशन केल्यानंतर बालिकेने आपले नाव कु. प्रिती सुरेश रावते असल्याचे सांगितले आहे. ही बालिका जर कोणाच्या ओळखीची अथवा जवळपासची रहिवाशी असल्यास संबंधितांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग, फोन नं.02141-225321 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा संस्थेच्या अधीक्षिका श्रीमती. सुवर्णा पिंगळे यांच्या 8378034582 या मोबाईल क्रमांकावर किंवा कर्जत पोलिस ठाणे यांच्या 02148- 222100) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या अधीक्षिका श्रीमती. सुवर्णा पिंगळे यांनी केले आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड