लॉकडाउन काळात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे विक्री, दुकाने ठराविक वेळेत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी




अलिबाग, जि.रायगड,दि.18 (जिमाका):- जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लॉकडाउनच्या काळात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे विक्री दुकाने / आस्थापना सकाळी 6.00 ते 11.00 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
            यापूर्वी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी करोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात दि.15 जुलै रात्री 12 वाजल्या पासून ते दि. 26 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याबाबतचा अध्यादेश बजाविला होता. या काळात किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे इ. घरपोच सेवा सकाळी 8 ते रात्री 10 वाजे दरम्यान पुरविण्यास परवानगी देण्यात आली होती.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान