शासकीय व खाजगी रुग्णालयांमधील उपलब्ध बेडच्या माहितीसाठी नियंत्रण कक्ष क्रमांक जाहीर

 

अलिबाग,जि.रायगड दि.21 (जिमाका) :-  जिल्ह्यामध्ये सर्व खाजगी व शासकीय कोविड-19 रुग्णालयांमध्ये उपलब्ध ऑक्सिजन बेड व आय.सी.यू. बेडबाबत सनियंत्रण करण्यासाठी तहसिलदार कार्यालयामध्ये व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यानुसार रायगड जिल्ह्यात कोविड-19 रुग्णांसाठी सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन बेड O2 व आय.सी.यू. बेडची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी प्रत्येक तहसिलदार कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आलेला आहे. या क्रमांकावर संपर्क केल्यास जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या बेडची माहिती उपलब्ध होवू शकेल.

तहसिल कार्यालय, अलिबाग-02141-222054, तहसिल कार्यालय, पेण-02143-252036, तहसिल कार्यालय, मुरुड-02144-274026, तहसिल कार्यालय, पनवेल-022-27452329, तहसिल कार्यालय, उरण-022-27222352, तहसिल कार्यालय, कर्जत-02148-222037, तहसिल कार्यालय, खालापूर-02192-275048, तहसिल कार्यालय, माणगाव-02140-262632, तहसिल कार्यालय, तळा-7066069317, तहसिल कार्यालय, रोहा-02194-232232, तहसिल कार्यालय, पाली-02142-242665, तहसिल कार्यालय, श्रीवर्धन-7249579158, तहसिल कार्यालय, म्हसळा-02149-232224, तहसिल कार्यालय, महाड-02145-222142, तहसिल कार्यालय, पोलादपूर-02191-240026, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग-02141-222118.

तरी गरजू नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक