ऑगस्ट 2020 चे प्रवेश अर्ज नव्याने ऑनलाईन पद्धतीने दि.4 जानेवारी 2021 पर्यंत भरावेत

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.31 (जिमाका) :-औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हसळा, जि.रायगड ही शासकीय संस्था असून या संस्थेत एक वर्ष मुदतीचे संधाता, नळकारागिर व (स्युईंग टेक्नॉलॉजी फक्त मुलींसाठी) आणि दोन वर्षे मुदतीचे जोडारी व इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या व्यवसायात ऑगस्ट 2020 चे प्रवेश अर्ज नव्याने ऑनलाईन पद्धतीने भरण्याचा दि.1 जानेवारी ते 4 जानेवारी 2021 या कालावधीमध्ये सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

तरी  इच्छुक उमेदवारांनी प्रवेशापासून वंचित राहू नये याकरिता आपले अर्ज नव्याने ऑनलाईन पध्दतीने भरावेत, असे आवाहन प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हसळा पी.एम.बिरार यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान