रोहा तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, भातसईसाठी मौजे शेणवई येथील शासकीय जागा हस्तांतरित
अलिबाग,
जि.रायगड दि.28 (जिमाका):- रोहा तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, भातसई
या इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे
यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश
दिले होते.
या पार्श्वभूमीवर मौजे शेणवई ता.पोलादपूर येथील
स.नं. 134अ क्षेत्र 3-96-00 हे.आर. पैकी 0-10-00 हे. आर. ही जमीन महसूल मुक्त व
सारामाफीने नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, भातसईकरिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे
यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी
जारी केले आहेत.
रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य
सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे.
०००००
Comments
Post a Comment