रायगडकरांना पासपोर्ट सुविधा उपलब्ध होण्यासाठी खासदार सुनिल तटकरे यांचे जोरदार प्रयत्न

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.26 (जिमाका):- पासपोर्ट बनविण्यासाठी रायगडकरांना लांबचा पल्ला गाठावा लागू नये व पासपोर्टची सुविधा अलिबागमध्येच उपलब्ध व्हावी, यासाठी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. सुनिल तटकरे यांचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज (दि.26 ऑक्टोबर) रोजी खासदार श्री.तटकरे यांनी  हरिष अग्रवाल, मुख्य पोस्ट मास्टर जनरल व राजेश गावंडे - विभागीय पासपोर्ट अधिकारी - भारत सरकार यांच्यासोबत बैठक घेवून सविस्तर चर्चा केली.

या बैठकीस गणेश सावळेशरकर - पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई, श्रीमती शरण्या मॅडम - संचालक पोस्टल सुविधा हे उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील पासपोर्ट ऑफिस सुरु करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पासपोर्ट कार्यालयाचे संबंधित अधिकारी अलिबाग येथील प्रस्थावित कार्यालयाच्या ठिकाणी भेट देणार असून हे कार्यालय लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही या अधिकाऱ्यांनी खा. सुनिल तटकरे यांना दिली.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक