करोनाच्या नियमांचे पालन करुन शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे निर्देश

 


अलिबाग,जि.रायगड,दि.27(जिमाका):- प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल क्षेत्रातील उरण, खालापूर, व कर्जत तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण- रायगड कार्डाच्या कार्यक्षेत्रातील अलिबाग, मुरुड, रोहा, महाड, माणगाव, व श्रीवर्धन या ठिकाणी शिबीर दौऱ्याचे कामकाज करताना शासनाने कोविड-19 या  साथ रोगाच्या दिलेल्या शिबिराच्या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असावे, शिबिराच्या ठिकाणी उपस्थितांनी मास्क परिधान करणे, वेळोवेळी सॅनिटायझरचा मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील, शिबिराच्या ठिकाणी उपस्थितांनी सोशल डिस्टन्सिंगचे  नियम पाळले जातील याची दक्षता घ्यावी, कोविड-19 केंद्र व राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करणे या सूचनांप्रमाणे शिबिराचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण- रायगड यांना दिले आहेत.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक