शेतीविषयक विविध सबसिडीकरिता शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी त्यांना मागणी करावयाच्या कृषी अवजारे, ठिबक व तुषार सिंचन, हरितगृह शेडनेट, पंपसेट, पाईपलाइन यांच्या सबसिडीकरिता अर्ज करावेत. त्याचप्रमाणे कीटकनाशक, बुरशीनाशक औषधांसाठी ज्या कृषी सेवा केंद्रांवर महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास केंद्र (MAIDC) यांची औषधी विक्रीसाठी उपलब्ध आहेत, त्या ठिकाणावरून खरेदी केल्यास 50% अनुदान देण्यात येत आहे.

त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम.उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

 

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक