निर्लेखित साहित्याच्या निविदा प्रक्रियेसाठी इच्छुक खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात--प्राचार्य श्री.के.डी.शिंदे
अलिबाग,दि.19(जिमाका):-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,महाड या संस्थेतील वापरून निर्लेखित झालेल्या साहित्याची विक्री जसे आहे त्या स्थितीत निविदा पध्दतीने करणे प्रस्तावित आहे. यामध्ये निर्लेखित झालेले हत्यारे, उपकरणे व लाकडी फर्निचर इत्यादी साहित्याचा समावेश आहे. या निविदा प्रक्रियेकरिता लिफाफा पध्दतीने निविदा सादर करावयाची आहे. त्यासाठी फक्त जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांकडून सीलबंद निविदा मागविण्यात येत आहेत. विक्री करावयाच्या वस्तू संस्थेतील संबंधित विभागामध्ये दि.23 जानेवारी ते दि.06 फेब्रुवारी 2023 या कालावधीत सुटीचे दिवस वगळून सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाहावयास मिळतील. याच कालावधीदरम्यान सादर करावयाच्या विहित नमुन्यातील निविदा अर्ज रु.300/- (अक्षरी रुपये तीनशे मात्र ) ना परतावा किंमतीत संस्थेच्या कार्यालयामधून विकत घेता येईल,
नमुन्यातील ही पूर्ण माहिती अचूकपणे भरलेली निविदा अर्जासोबत रु. 5 हजार अनामत रक्कम जमा करणे गरजेचे असेल. या रक्कमेचा भरणा प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड जि. रायगड या नावाने डी.डी. च्या स्वरुपात करावा. इच्छुक जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांनी विहीत नमुन्यातील निविदा अर्ज डी.डी. सह (प्रपत्र अ व प्रपत्र ब करिता स्वतंत्र लिफाफे द्यावेत) दि.6 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून सिलबंद लिफाप्यात कार्यालयात जमा कराव्यात.
निविदा प्रक्रीया रद्द करण्याचा किंवा त्यामध्ये फेरबदल करण्याचा संपूर्ण अधिकार प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड यांनी राखून ठेवला आहे. या सिलबंद निविदा दि.07 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 2.30 वा. संस्थेच्या प्राचार्याच्या कक्षात उघडण्यात येतील, असे महाड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री.के.डी.शिंदे यांनी कळविले आहे.
०००००००
Comments
Post a Comment