मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) श्री.बुदिती राजशेखर यांची जिल्हाधिकारी कार्यालयास भेट रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याशी केली चर्चा

 


 

रायगड दि.03,(जिमाका):- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 अंतर्गत मावळ मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक ( सर्वसाधारण ) श्री.बुदिती राजशेखर यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन त्यांच्यासमवेत 31 मावळ लोकसभा मतदारसंघात जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरु असलेल्या पूर्वतयारी बाबत चर्चा केली व त्यांनी निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप,  जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते.

       मावळ लोकसभा मतदार संघातील  मावळ लोकसभा मतदारसंघाचे उरण, पनवेल,  कर्जत विधानसभा क्षेत्रातील भाग असून मतदारसंघाशी संबंधित कामकाज सुरू आहे. निवडणूक निरीक्षक श्री.बुदिती राजशेखर यांनी जिल्हा निवडणूक आचारसंहिता कक्ष,  निवडणूक सनियंत्रण कक्ष, मीडिया सेल आदींची पाहणी केली. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.

निवडणूक निरीक्षक श्री. राजशेखर यांची माध्यम कक्षास भेट

       माध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक मीडिया सेल, समाज माध्यम द्वारे प्रसिद्धी, तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया,  जिल्हा माध्यम कक्षातून प्रसार माध्यमे व वृत्तपत्र प्रतिनिधी यांच्याशी समन्वय राखला जात आहे. निवडणूक निरीक्षक श्री. राजशेखर यांनी जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या कामकाजाबद्दल माहिती घेतली. निवडणुकीची मतदान जागृतीसाठी स्विपसह विविध उपक्रमांच्या प्रसिद्धीची माहिती माध्यम कक्ष प्रमुख मनीषा पिंगळे यांनी यावेळी दिली.  

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक